शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

...तर सदाभाऊंना तोंड दाखविणे होईल अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:46 IST

जयसिंगपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माझ्याकडे जेवढी कुंडली आहे तेवढी कुणाकडे नाही. त्याबद्दल मी जर बोललो तर सदाभाऊ तुम्हाला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी त्यांना लगावला.

ठळक मुद्देऊस परिषदेत तुपकर यांचा इशारा सतीश काकडेंसह सर्वच वक्त्यांनी उठविली केंद्र, राज्य सरकारवर टीकेची झोडराज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्या

विश्वास पाटील/राजाराम लोंढे/ संदीप बावचे ।जयसिंगपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माझ्याकडे जेवढी कुंडली आहे तेवढी कुणाकडे नाही. त्याबद्दल मी जर बोललो तर सदाभाऊ तुम्हाला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी त्यांना लगावला.येथील विक्रमसिंह मैदानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोळाव्या ऊस परिषदेत ते बोलतहोते. ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवून मोदी सत्तेवर आले, परंतु आताअच्छे दिन राहू देत, आमचेपूर्वीचेच दिन परत द्या, असे म्हणायची पाळी लोकांवर आली आहे.

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणल्यावर त्यांची तुलना लोकांनी हिटलरशी केली, परंतु मोदींनी त्यांचेही रेकॉर्ड मोडल्याची टीका तुपकर यांनी केली.राष्ट्रीय किसान समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग म्हणाले, ‘देशभरातील १८२ शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांवर गोळ््या झाडण्याचे धाडस कुण्या मोदी अथवा शिवराजसिंह यांना होणार नाही. देशभरातील शेतकरी २० नोव्हेंबरला दिल्लीत धडक देऊन मोदी यांच्याकडे हिशेब मागतील.शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी, सदाभाऊ खोत यांनी काय बोलायचे याचेभान न बाळगल्यास त्यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत, असा इशारा दिला.परिषदेतील महत्त्वाचे ठरावऊस उत्पादकांना २०१७-१८च्या हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी३४०० रुपये द्या.राज्य बँकेने कारखान्यांना ९० टक्के उचल द्यावी.गतवर्षीची एफआरपी न देणाºया कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा.गोदाम व कारखान्याच्या गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा.ऊस बिलातून कोणतीही कपात करण्यास विरोध.साखर आयात करण्यास कडाडून विरोध करणार.ऊस तोडणी मजूर महामंडळास शासनाने निधी करून द्यावा.अत्यंत जोशपूर्ण वातावरणपरिषदेच्या ठिकाणी अत्यंत जोशपूर्ण वातावरण होते. खोत संघटनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शेट्टी व संघटनेवर केलेली टीका लोकांना आवडली नव्हती. त्यामुळे त्यांना प्रत्त्युतर देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने आले होते. ढोल-ताशे, एकच गट्टी..राजू शेट्टी अशा घोषणांमुळे वातावरणात उत्साह होता. खोत यांच्यासंबंधी वक्ते बोलू लागल्यावर समुदायातून त्यास फेटे उडवून दाद मिळत होती. स्वत: शेट्टी यांनी मात्र खोत यांचा नामोल्लेखही न करता त्यांना बेदखल केले.पवारांविना परिषद  --ऊस परिषद म्हटली की ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार असे, परंतु आजच्या परिषदेत त्यांचा साधा नामोल्लेखही झाला नाही. सर्वच वक्त्यांनी मोदी, सदाभाऊ आणि दोन्ही सरकारवर टीका केली.उत्तम संयोजनपरिषदेचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उत्तम संयोजन केले. आण्णासाहेब चौगले यांनी स्वागत केले. विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविक केले. सांगली जिल्हाध्यक्ष विलास देशमुख, सयाजी मोरे यांचीही भाषणे झाली. कारखानदारांनीही संघटनेची धास्ती घेऊनच दराबाबत वाच्यता केली नाही, असे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी सांगितले.

सरकारची गाजराची औलाद!राज्य व केंद्र सरकारने आतापर्यंत कर्जमाफी, राममंदिर, काळा पैसा, बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांचे स्मारक, महागाई कमी करणार अशी नुसती सगळी आश्वासनांची डझनभर गाजरे दाखवली.त्यामुळे तोल जातोय  सतीश काकडे म्हणाले, खोत यांच्यासाठी आम्ही मोहिते-पाटील घराण्याचे वैरत्व पत्करले. तुमच्या प्रचारासाठी खिशातील पाच लाख रुपये दिले आणि तरी तुम्ही चळवळीबद्दल अपशब्द वापरता, त्यामुळे आमचा तोल जात आहे.मूल होण्यासाठी फॉर्म

कर्जमाफीसाठी ६६ कॉलमचा फॉर्म भरायला लावणारे राज्य सरकार उद्या नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याला मूल होण्यासाठीही ६६ कॉलमचा फॉर्म भरायला लावेल, अशी टीका परिषदेत झाली.गतवर्षीची मागणी ३२०० रुपयांचीस्वाभिमानी संघटनेने गतवर्षी टनास एकरकमी ३२००रुपये देण्याची मागणी याच परिषदेत केली होती. नंतर चर्चेतून एफआरपी व १७५ रुपये जादा असा तोडगा निघाला व आंदोलनाची कोंडी फुटली होती. यंदा एफआरपीपेक्षा जादा किती रक्कम मिळणार याविषयी उत्सुकता आहे.तुमचा भुजबळ होईल..सरकारच्या विरोधात जे लोक बोलतात त्यांना भाजपवाले ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, भुजबळ यांचा दाढी वाढवलेला फोटो दाखवितात. मग तो पक्षात येतो म्हटला की थेट भाजपमध्ये न घेता वेगळी संघटना काढायला लावतात. फोडा,झोडा अशी त्यांची नीती असल्याची टीका तुपकर यांनी केली. कर्जमाफीसाठी ६६ कॉलमचा फॉर्म भरायला लावणारे राज्य सरकार उद्या नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याला मूल होण्यासाठीही ६६कॉलमचा फॉर्म भरायला लावेल अशी टीका परिषदेत झाली.मान्यवरांची उपस्थितीपरिषदेत प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे, दशरथ सावंत, महिला आघाडी प्रमुख रसिका ढगे, प्रा. जालंदर पाटील, कर्नाटक रयत संघटनेचे कुमार मुतन्नाप्पा, हंसराज वडगुळे, सांगली जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, राज्य प्रवक्ता महेश खराडे, बीडच्या पूजा मोरे यांची भाषणे झाली.कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, बारामती, फलटणपासून ते अहमदनगर, नाशिक विदर्भापर्यंतचे शेतकरी आले होते. संदीप जगताप यांनी कविता सादर केली.भाजपवाल्यांच्या वर लाथशिवछत्रपतींचा आशीर्वाद... .......चला देऊ भाजपला साथ अशी घोषणा देऊन राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले. आता पुढच्या निवडणुकीत शिवछत्रपतींचा आशीर्वाद.. चला देऊ भाजपवाल्यांच्या वर लाथ. यासाठी सज्ज व्हा, असे तुपकर यांनी सांगितले.निवडणुकीसाठी निधीराजू शेट्टी यांना लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीसाठी परिषदेत शेतकºयांनी स्वत:हून निधी दिला. यामध्ये लहान मुलेही मागे राहिली नाहीत. दिल्ली येथील मोर्चासाठी रेल्वे खर्च म्हणून उदगावचे माजी सरपंच विश्वास कोळी यांनी ५० हजारांची मदत दिली.दादांच्या खिशात दोन आमदारपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील दिलेला शब्द पाळत नसल्याचे सांगत प्रा. जालंदर पाटील म्हणाले, दादांच्या वरच्या खिशात दोन आमदार, तर खालच्या खिशात महामंडळे असतात. त्यामुळे ते भाजपमध्ये घेण्याचे आमिष दाखवत सुटले आहेत.एकेरी शब्दात टीकाऊसदराला मटका म्हणणारे पंधरा वर्षे बुकी होते का? असा सवाल करत अनिल मादनाईक म्हणाले, मोटारसायकलवरून फिरणाºयाकडे आलिशान गाडी, बंगला आला कोठून, भान ठेवून बोला, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ.मोदींचा १६ लाखांचा सूटहिंगोली जिल्ह्यातील एका शेतकºयाने मुलीच्या लग्नात बस्ता घ्यायला १३ हजार रुपये मिळाले नाहीत म्हणून आत्महत्या केली; पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका समारंभात १६ लाखांचा सुट घालून मिरवत होते, अशी टीका शेट्टी यांनी केली.गुलाबासह पेरूचा हारभला मोठा गुलाब फुलांसह पेरूंचा हार घालून शेतकºयांनी राजू शेट्टी यांचा सत्कार केला, तर एक वयोवृद्ध शेतकºयाने धडपडत येऊन शेट्टी यांना मिठी मारल्याने सभास्थळावरील वातावरण चांगलेच भावनिक झाले.गुळासाठी टनाला ३४०० रु.तिरपण (ता. पन्हाळा) येथील शेतकरी कृष्णात जाधव यांचा ऊस गुºहाळघरासाठी प्रतिटन ३४०० रुपये दराने आनंदा पाटील या गुºहाळमालकाने घेतला. दहा टनांचा ३४ हजार रुपयांचा धनादेश शेट्टी यांच्या हस्ते संबंधित शेतकºयाला दिला.चळवळीची ताकदसदाभाऊ खोत गेले असले तरी असे शेकडो सदाभाऊ निर्माण करण्याची ताकद शेतकरी चळवळीत आहे. ज्या जनतेने त्यांना खांद्यावर घेतले, तीच उद्या पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नसल्याची टीका प्रा. जालंदर पाटील यांनी केली.शेट्टीच चळवळीचे वजीरसध्या संघटनेचे पेव फुटल्याचे सांगत सदाभाऊंनी नवीन संघटना काढली आहे. कोणी कितीही डांगोरा पिटला तरी शेतकरी चळवळीचा वजीर राजू शेट्टीच असल्याचे जालंदर पाटील यांनी सांगितले.रामरहीमचा बंदोबस्त कराकेंद्राने हरियाणातील रामरहीमचा फांडाफोड केला. आता राज्यातील ‘रामरहीम’चा बंदोबस्त करा, हा बाबा कोण हे सगळ्यांना माहिती असल्याचा टोला तुपकर यांनी हाणला.मग शेट्टी जातीवादी कसे?आपल्यासारख्या ९६ कुळी मराठा समाजातील कार्यकर्त्याला सर्वप्रथम लाल दिवा देऊन बहुजन समाजाचा सन्मान केला. मग राजू शेट्टी जातीयवादी कसे? असा सवाल तुपकर यांनी केला.दादांनी राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावेराज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्याउसाचा दर संपल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सांगत आहेत. ऊसदरासाठी आम्ही सक्षम आहोत, चंद्रकांतदादांनी राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे प्रकाश पोपळे यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टी